लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणांना लुटले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बीड बायपास रस्त्यावरील हेगडेवार हॉस्पिटलजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या दोन मित्रांना अडवून चार अज्ञात भामट्यांनी दुचाकी व मोबाईल हिसकावून पसार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी एम आयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश राजलिंगम मटदेवू (वय २५, रा. रेणुका माता कमान, बीड बायपास) असे लुटल्या गेलेल्या तरुणाचे नाव आहे. २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास महेश मटदेवू हे त्यांचे मित्र कैलास कुलकर्णी यांच्यासोबत मित्राची हिरो होंडा

स्प्लेंडर (MH-20-CG-3936) वरून जात होते. हेगडेवार हॉस्पिटलजवळ दुचाकी उभी करून दोघे लघुशंकेसाठी गेले असता, चार अज्ञात इसमांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर आरोपींनी बळजबरीने दुचाकीची चावी काढली आणि महेश यांच्याकडील १२ हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर चौघे आरोपी दुचाकी आणि मोबाईल घेऊन पसार झाले. या प्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार चांदेकर करत आहेत.

https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions